Monday, December 21, 2009

दामेंडा पाडानं गाणं १


सोनानी कुदाई रुपानं दांड, रुपानं दांड
खंदानी खंदा ( गावाचे नाव )नी खाण, ( गावाचे नाव )नी खाण
( गावाचे नाव )नी खाणनी रेवायी माटी, रेवायी माटी
ती माटी ती माटी तमाणे भरा, तमाणे भरा
तमाणे भरा रुमाले झाका, रुमाले झाका
वाजत गाजत कुमार(कुंभार) घरी, कुमार घरी
कुमार भाऊ तु दामेंडा(मडके) घडी, दामेंडा घडी
घरधनी जागाडे मायन्या बहिणी, मायन्या बहिणी
मायन्या बहिणी तुम्ही रांधाले इंगा, रांधाले इंगा
आणानी आणानी गंग्यानं पाणी, गंग्यानं पाणी
कणीक भिजील्या डाबान्या वाणी, डाबान्या वाणी
लोयाच भरील्या निंबुन्या फोडी, निंबुन्या फोडी
खिरच रांधिली कापुरना डेरा, कापुरना डेरा
भातच रांधिला मोगरान्या कया, मोगरान्या कया
पापड तयिला पुनीना चांद, पुनीना चांद
कुल्लाया तयिल्या सुर्याला तेज
बोंडेच काढीले मखमली गेंद, मखमली गेंद
शिय्याच वयल्या आसमानना तारा, आसमानना तारा
लाडुच बांधीला रामना चेंडु, रामना चेंडु
जेवाडा जेवाडा नवरदेवनं गोत, नवरदेवनं गोत
नवरदेवना गोतनी भुकमोड झायी, भुकमोड झायी
नवरीना बाप तो वाण्याघर जायी, वाण्याघर जायी
शेरभर आटा तो मोजीवं लयी, मोजीवं लयी
त्याबीवं आटानी चुटपुट झायी, चुटपुट झायी
बलावा बलावा गावना न्हायी, गावना न्हायी
भलाया पाटीलनी भलायी कयी, भलायी कयी
नवरदेवना बापनी हेटुयी(फजिती) झायी, हेटुयी झायी.

टिप: काही अवघड शब्दांचे अर्थ कंसात दिलेले आहेत.

2 comments: